आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँजिओग्राफी आणि औषधांची देयके सादर करूनही विमा परताव्याची पूर्ण रक्कम न देणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सादर केलेल्या देयकांतील रकमेसह तक्रार खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.
जुना जालना भागातील संजय वझरकर यांनी स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. विमा कालावधीत छातीत दुखत असल्याने त्यांनी एनजीओग्राफी सह दोन इस्पितळांमध्ये दोन वेळा उपचार घेतले.
विमा कंपनीकडे विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक ती देयके व कागदपत्रे सादर करूनही कंपनीने पूर्ण रक्कम न देता केवळ ३२ हजार ३२७ रुपये रक्कम अदा केली. उर्वरित रकमेबाबत पाठपुरावा करूनही कंपनीकडून रक्कम मिळत नसल्याने ॲड. मयूर ढवळे यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.