आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना शहरात अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी पाईपलाईन अंथरण्यात आली आहे. तसेच आठ जलकुंभांची कामेही झाली आहे. परंतू, अजूनही अनेक भागांत पंधरा-विस दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी आढावा घेऊन पाणी पुरवठा अभियंत्यांना तात्काळ जोडणी करुन घ्यावी, असे आदेश दिले आहेत.
जालना शहरात उिशराने पाणी पुरवठा होण्यासह अंतर्गत जलवाहीनीचे काम अनेक वर्षांपासून सुरु असल्यामुळे अजूनही आठवड्यातून दोन दिवस पाणी येत नसल्यामुळे भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, पाण्यासाठी ओरड होत असल्यामुळे मुख्याधिकारी खांडेकर यांनी किती जलकुंभ झाले, किती पाईपलाईन अंथरण्यात आली, त्या जलकुंभांची जोडणी झाली का, या सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. तसेच पाणी पुरवठ्याची सायकलींग कमी करण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यांना आदेशही देण्यात आले आहेत. आगामी काळात पाणी पुरवठ्याची सायकलींग कमी होण्याची शक्यता आहे.
पूर्णपणे ही सायकलींग कायम कमी होण्यासाठी मोठ्या जलशुध्दीकरण केंद्राचीही गरज आहे. याबाबतीही नगर पालिकेकडून पाठपुरावा केल्या जात आहे. फडणविस यांच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. परंतू, टाक्यांची जोडणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याची सायकलींग कमी होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.