आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नांची सोडवणूक:विभागीय लोकशाही दिनाचे 14 ऑक्टोबर रोजी आयोजन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिन होणार आहे.या तक्रार करण्यासाठीचे अर्ज १५ दिवस आधी विहित नमुना प्रप्रत्र-१ (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-१ (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतपूर्व अर्ज विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाहीदिनी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. ज्यांनी यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाहीदिनी तक्रार अर्ज दिलेले असतील, परंतु त्यांच्या प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनात घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...