आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही दिन:विभागीय लोकशाही दिनाचे ८ ऑगस्ट रोजी आयोजन

जालना5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे मे महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (८ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

तक्रार करण्यासाठीचे अर्ज १५ दिवस आधी विहित नमुना प्रप्रत्र-१ क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज प्रपत्र-१ आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतपूर्व अर्ज विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास, खोकडपुरा, औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...