आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज महोत्सव उपक्रमांतर्गत माध्यमिक शिक्षण विभागातर्फे चार दिवस स्पर्धासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान क्रांती दिन, समूह राष्ट्रगान, शालेय विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय गीतगायन, नृत्य, एकपात्री अभिनय, समूहगान स्पर्धा, १० ऑगस्टला शालेय ‘अ’- गट इयत्ता १ ते ५, ब- गट इयत्ता ६ ते ८ तर क -गट ९ ते १२ या गटात वैयक्तिक आणि समूह प्रकारात देशभक्तीपर गीत गायन, सामूहिक नृत्य, एकपात्री अभिनय,समूह गान स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी पहिले,दुसरे आणि तृतीय पारितोषिक,स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र असे स्वरूप आहे. प्रत्येक गटासाठी एका शाळेतून एकच स्पर्धक, संघ असेल. समूह गीत,समूह नृत्य सादरीकरणास ६ मिनीटे इतकाच वेळ असेल. जिल्हास्तरीय स्पर्धा या जालना शहरातील देऊळगाव राजा रोड परिसरातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथील सभागृहात होणार आहे.

अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धेसाठी नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. समिती प्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी मंगल धुपे या आहेत.समिती सदस्य म्हणून विपुल भागवत, आसावरी काळे, रवी जोशी, एन. जी. कुमावत, पी. के. शिंदे, पी. आर. जाधव, प्रकाश कुंडलकर, डाॅ.सुहास सदाव्रते, जगत घुगे, दीपक दहेकर, एम.पी.राठोड, कवाणकर, मनिषा पाटील, विजय शिंदे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले संघ पाठवावेत असे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...