आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:भोकरदन येथे पोलिस भरती सराव परीक्षा स्पर्धेचे आयोजन

भोकरदन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार संतोष दानवे यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील होतकरू तरुण - तरुणींसाठी सराव परीक्षा स्पर्धा १७ डिसेंबर सकाळी ९ वाजता क्रीडा प्रबोधिनी मैदान भोकरदन येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी १० डिसेंबरपर्यंत भाजप कार्यालय भोकरदन, जाफराबाद येथे करावी. या सराव परीक्षा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलिस भरती, स्टाफ सिलेक्शन भरती, बँकिंग तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील आपले स्थान जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे. या सराव परीक्षा स्पर्धेत आमदार संतोष दानवे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार, उत्तेजनार्थ ५००० रुपये बक्षीस रोख तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी काळात शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात पोलिसभरती तसेच विविध शासकीय नोकरभरती करण्यात येणार आहे.

भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील या विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळावी म्हणून दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या होतकरू तरुण तरुणींसाठी ही सराव परीक्षा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना आगामी काळातील भरतीतील त्यांचे नेमके स्थान काय याची कल्पना येईल, असे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...