आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनियस स्पर्धा:भेाकरदन येथे विद्यार्थ्यांसाठी महा आयटी जिनियस स्पर्धेचे आयोजन

फत्तेपुर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित व आयकॉन कंप्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयकॉन कंप्युटर्स भोकरदन येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महा आयटी जिनियस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने कंप्युटरद्वारे घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाची व्याप्ती कळावी म्हणून शासनाने वेगवेगळे आयटी संबंधित उपक्रम शालेय स्तरावर राबविण्यास वेळोवेळी सूचित केले आहे.

त्याचसोबत भारताच्या माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करावयाचे आहे. याचाच एक भाग म्हणून एमकेसीएल च्या माध्यमातून ही स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर घेतली जाणार आहे. तसेच या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके एमकेसीएलच्या वतीने दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी शाळांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी या स्पर्धेसाठी करण्याचे आवाहन आयकॉन कंप्युटर्सचे संचालक विकास बोर्डे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...