आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मायनाॅरिटी, मारवाडी ट्रस्टचे महाराष्ट्र अभियान:जालना, परतूर शहरात दोनदिवसीय मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालना महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा जालना, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मदनलाल सीताराम अग्रवाल, स्व. श्रीमती सावित्रीबाई कचरूलाल राठी यांच्या स्मृत्यर्थ २० ऑगस्ट रोजी परतूर येथील मंत्री बाल रुग्णालय,तर २१ ऑगस्ट रोजी जालना येथील तपोधाममधील गुरु गणेश मंगल कार्यालयात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष ललीत गांधी व महामंत्री संदिप भंडारी यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोगच्या तपासण्या मोफत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विथऑल सेटअप व्हॅनद्वारे उपस्थित राहून मोफत तपासणी करतील. मोफत शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे विरेंद्र धोका, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाचे अध्यक्ष वीरेंद्र रुणवाल, सचिव दिनेश बरलोटा, प्रकल्प प्रमुख संजय बंब, मनोज मुथा, सह प्रकल्प प्रमुख उमेश पंचारिया, महेश भक्कड, सुनील राठी, सुदेश करवा, सीए नितीन तोतला, महावीर जांगिड, मनीष तवरावाला, डॉ. संदीप मुथा आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...