आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:कृषी विज्ञान केंद्र खरपुडीत जागतिक मृदा दिनाचे आयोजन

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि विभागाच्या सयुंक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कृषि विज्ञान मंडळाचे ३०४ वे मासिक चर्चासत्र आणि जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येणार असून जमिनीचे आरोग्य या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शेती अभ्यासक आणि शून्य मशागत तंत्राचे पुरस्कर्ते श्री.प्रताप चिपळूणकर यांच्या “कमी खर्चात जमिनीच्या आरोग्याची जोपासना” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिरत्न विजय अण्णा बोराडे यांची उपस्थिती असणार आहे, तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...