आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन:जेईएस महाविद्यालयात मंगळवारी योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि क्रिडा विभागयांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात येणार आहे. २१ जून रोजी सकाळी ठीक ६ वाजता जेईएस महाविद्यालयाच्या मुक्त प्रांगण येथे योगा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या साठी योग शिक्षक अक्षय धोंगडे, आणि बॉबी अग्रवाल यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. जागतिक योग दिन हा २१ जून रोजी जगात साजरा केला जातो. यावेळी योग करून आपण कसे निरोगी राहू शकतो या उद्देशाने सर्व लोक आपापल्या सोयीच्या प्रमाणे योग आसन करतात. तसेच विद्यार्थी जीवनात योगाचे फार मोठे महत्त्व आहे. योगामुळे शरीरातील उर्जा नियंत्रित ठेवता येते व मनाची स्थिरता कायम राहते. दैनंदिन जीवनात योगा साठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आपण पण योग करूया. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.बजाज यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...