आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंठा बंद:सकल मराठा समाजाच्या वतीने मंठा बंदचे आयोजन, सर्वांनी सहभागी व्हावे

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या आक्षेपार्ह विधानामुळे लोकांच्या तीव्र भावना असून, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी मंठा तालुका बंदचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

यानिमित्ताने नुकतेच सरस्वती मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ७ डिसेंबर रोजी मंठा तालुका बंदचा ठराव मांडण्यात आला. या बैठकीसाठी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान, ७ रोजीच्या बंदमधे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...