आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आशिर्वादाने श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण ता. पाथरी येथे ६ ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दत्त जन्मोत्सवाचा जालना जिल्ह्यातील सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा निरीक्षक विजय देशपांडे, नवनाथ पवार तसेच स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ जालनाच्या वतीने करण्यात आले आहे.

६ डिसेंबर रोजी अन्नदान याग व दत्त याग कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून रात्री ११ वाजता नाम सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती लंके यांनी दिली. दत्त जयंती दिवशी पहाटे ५ वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सकाळी सहा वाजता नाम सप्ताह सोहळ्याची सांगता होईल, सेवेकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...