आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपदेश:संप्रदायास जपाल तरच‎ आपली संस्कृती टिकेल‎

भोकरदन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात कलीयुगाला‎ सुरुवात झाली असुन तरुण पिढी‎ मोठी मोबाईलसह इतर व्यसनाच्या‎ नादी लागली असुन अशी पिढी‎ तयार झाल्यास धर्म संस्कृती‎ नामशेष होण्याची शक्यता नाकारता‎ येणार नसुन प्रामुख्याने सांप्रदायीक‎ क्षेत्रात मोठा बदल झाला असुन या‎ सांप्रदायामुळेच धर्म संस्कृती टिकुन‎ आहे आणि टिकेल, असे प्रतिपादन‎ किर्तपकसा तथा प्रबोधनकार‎ संगिताताई व्यवहारे यांनी केले.‎ आलापूर येथील सिध्देश्वर नगर‎ येथे आयोजित अखंड हरिनाम‎ सप्ताहात त्यांनी धन्य ते संसारी‎ दयावंत जे अंतरी या अभंगावर‎ विविध दृष्टांतांची उदाहरणे देत‎ निरुपण केले.

ज्यांच्या अंगी दया‎ आहे ते या जगात धन्य आहेत.‎ कारण ते केवळ उपकारासाठीच‎ आले असुन त्यांचे घर हे वैकुंठात‎ आहे आणि ते कधी लटीके बोलत‎ नाहीत आणि देहा संबधी उदास‎ असतात. तरुण आणि लहान‎ मुलांनी मोबाईलचा वापर कमी‎ करून आपले पुढील भविष्य‎ घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, आई‎ वडीलांनी देखील आपली मुल कशी‎ वागतात हे ओळखून योग्य पर्याय‎ निवडावा व सर्वांनी इतरांच्या सुख‎ दुखात सामील सामील होऊन‎ परोपकारी बना, असा संदेशही‎ यावेळी संगीता व्यवहारे यांनी िदला.‎ यावेळी भाविकांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...