आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास योजना:आमचा गाव आमचा विकास योजनेतून कायापालट

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमचा गाव आमचा विकास योजना ग्रामीण भागात प्रत्येक गावात प्रभावीपणे राबविल्यास संपूर्ण गावाचा विकासात्मक कायापालट होणार आहे. प्रत्येक नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवून विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना मदत करावी. असे प्रतिपादन विनोद गावंडे यांनी केले. आमचं गाव आमचा विकास अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर उदघाटनप्रसंगी ते बोलत हाेते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश ठाले, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, गजानन पाखरे, डी. एस. काकडे, पी. डब्लू. सोनवणे, डी. व्ही. इंगळे, ए. ई. गायकवाड, ऋषि पगारे, नंदू गिऱ्हे उपस्थित होते.

तज्ञ प्रशिक्षक एम. बी. सरोदे, श्याम राजपूत यांनी “आमचा गाव आमचा विकास” योजनेचे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन केले. दम्यान, आमचा गाव आमचा विकास योजना ग्रामीण स्तरावर यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींनी आपापल्या गावातील ग्रामस्थांशी संपर्क करून गावाचा विकास आराखडा तयार करावा, असे गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांनी सांगितले तर ी प्रत्येक ग्रामस्थांनी ग्रामसेवकासोबत चर्चा करून गावाच्या विकासासंबंधीच्या त्यांच्या सर्व कल्पना सांगून,आराखडा तयार करण्यास मदत करावी, असे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...