आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा डोळा:घनसावंगी तालुक्यात 235 शाळांपैकी केवळ 18 शाळांत सीसीटीव्हीची नजर

कुंभार पिंपळगाव / विठ्ठल काळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही काळात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनी बाबत घडलेल्या काही घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे तत्कालिन शिक्षणमंत्र्याकडूनच सांगण्यात आले होते. मात्र घनसावंगी तालुक्यात जिल्हा परिषद आणि खासगी अशा एकूण २३५ शाळा आहेत. त्यापैकी केवळ अठरा शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यातही खासगी शाळांचा जास्त समावेश आहे.

घनसावंगी तालुक्यातील जवळपास ४३ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील काही महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. यानंतर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. दरम्यान मागील काळातील तत्कालिन शालेय शिक्षण मंत्र्यांनीच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सुचित केले होते .यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास निधी, स्थानिक स्वराज्य संस्था, सीएसआर किंवा लोकसहभागातून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची ही माहिती समोर आली होती. मात्र या बाबीकडे घनसावंगी तालुक्यातील शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. घनसावंगी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७४ व ६१ खासगी शाळा आहेत. त्यापैकी पंधरा खासगी आणि तीन जिल्हा परिषद शाळामध्ये सिसिटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. घनसावंगी तालुक्यात साखर कारखान्याची संख्या जास्त आहे. यामुळे बहुतांश ऊसतोड कामगार हे आपले वस्तीग्रह किंवा नातेवाईकाकडे पाल्यांना ठेवून कामाला जातात. यामुळे असे विद्यार्थी- विद्यार्थिनी अनेकदा अबोल राहतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी वस्तीग्रह तसेच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे पालकांतून बोलले जात आहे.

सुरक्षिततेला प्राधान्य हवे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेची असते. परंतु शाळेमध्ये खरंच विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा प्रश्न शाळा मध्ये कोणती दुर्घटना झाल्यानंतर पडतो. परंतु शाळांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळता येत नाही. दुर्घटनेमुळे होणारे नुकसान मात्र कमी करता येऊ शकते. जास्तीत जास्त दुर्घटना या ग्रामीण भागात झाल्याचे दिसून येते. यामुळे शिक्षण विभागाने काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

प्रथमोपचार ज्ञान असलेला प्रशिक्षक गरजेचा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळा या ग्रामीण भागात शेत शिवारालगत व मुख्य रस्त्यालगत आहे. सर्पदंश, चेंगराचेंगरी, खेळता खेळता हाड, हातपाय आशा दुर्घटना होत असतात. अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना योग्य वेळेत प्राथमिक उपचार दिला तर होणारे नुकसान टाळता येते, या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शिक्षण विभाग प्रशासनाकडून प्रथमोपचाराची ज्ञान असलेला अधिकृत प्रशिक्षक नेमण्यात यावा. शिवाय प्रत्येक शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे.

वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू घनसांगी तालुक्यातील सध्या जवळपास १८ ठिकाणच्या जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये संबंधित ग्रामपंचायत व लोकसभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत चर्चा करून लवकरात लवकर वरिष्ठेच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया व कारवाई करण्यात येईल. रवींद्र जोशी, गटशिक्षणाधिकारी, घनसावंगी

या शाळांत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा कै. दत्ता साहेब देशमुख माध्यमिक विद्यालय घनसावंगी, कै.दत्ता साहेब देशमुख प्रायमरी स्कूल घनसावंगी, कै.दत्ता साहेब देशमुख प्रायमरी स्कूल घनसावंगी (उर्दू), हाजी अब्दुल आर गुलाम रसूल उर्दू हाय घनसावंगी, संत रामदास जुनिअर कॉलेज घनसावंगी, शेठ मेघाराजजी सुराणा इंग्लिश स्कूल घनसावंगी, एच.ए.एस.आर टेक्निकल इंग्लिश स्कूल घनसावंगी, सरस्वती भवन प्रशाला कुंभार पिंपळगाव, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल कुंभार पिंपळगाव, महात्मा फुले सेकंडरी हायर सेकंडरी हायस्कूल पानेवाडी, सरस्वती भवन हायस्कूल रांजणी, मौलाना सिद्दिक अहमेद उर्दू प्रायमरी स्कूल रांजणी, सरस्वती भवन प्रायमरी स्कूल रांजणी, मत्स्योदरी विद्यालय तीर्थपुरी, लिटल स्टार इंग्लिश स्कूल तीर्थपुरी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तिर्थपुरी, मत्स्योदरी जुनियर कॉलेज तीर्थपुरी, कै.शिवाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिर्थपुरी

बातम्या आणखी आहेत...