आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम घट:निकाल 30,452 पैकी 28,781 विद्यार्थी झाले दहावी उत्तीर्ण, निकाल चार टक्क्यांनी घसरला ; केवळ 1372 विद्यार्थी नापास

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२२ महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात अपेक्षेप्रमाणेच मुलींनी ९६.८६ टक्क्यांवर बाजी मारली आहे. यावर्षी प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून १४१६३ तर ग्रेड एकमध्ये ९९५५ विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा १ हजार ३७२ विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान अभ्यासक्रमात घट, वाढीव वेळ दिल्याने उत्तीर्णांनी टक्केवारीची बरेाबरी करत ९५.४४ गाठता आले आहे. मागील वर्षी परीक्षेविना दहावीचा निकाल ५०-३०-२० या गुणसूत्रानुसार जाहीर करण्यात आला. यामुळे उत्तीर्णांची टक्केवारी वाढण्याबरोबरच गुणांच्या टक्केवारीतही भरमसाट वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी मेरिटच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिकच झाली होती. यावेळी झालेली परीक्षाही या धाेरणाच्या खालोखालच राहिली. अभ्यासक्रमात घट, वेळेची वाढीव सवलत तसेच शाळा हेच परीक्षा केंद्र होते. याचा फायदा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारा राहिला. यंदा मार्च २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी एकूण ३०१५३ विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला सामोरे गेले. यातील २८७८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची धडधड शुक्रवारी दुपारनंतर कमी झाली. निकाल ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची इंटरनेट कॅफे तसेच इतर एमएससीआयटी केंद्रांवर गर्दी केली होती. वेबसाटवर एकाच वेळी सर्वजण टपून बसल्याने दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अनेकांना निकाल पाहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल एका तासानंतर वेबसाइवरटचा लोड कमी झाल्यानंतर त्वरित निकाल उपलब्ध झाला. काहींना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर होता. काहींनी मात्र दहावीत पास झाल्याचा आनंद साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...