आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप‎:मैदानी खेळांमुळे शरीर, मन सशक्त राहते‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैदानी खेळांमुळे शरीर सशक्त‎ आणि मन निरोगी राहते, असे‎ प्रतिपादन अग्रशक्ती बहुमंडळाच्या‎ अध्यक्षा आयुषी बगडिया यांनी‎ केले.‎ येथील जनता प्राथमिक विद्यालय‎ व जनता हायस्कूल जालना येथे‎ अग्रशक्ती बहु मंडळ जालना व‎ स्व.जमनाबाई शिवरतन बगडिया‎ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त‎ विद्यमाने मुलांना मोबाईल कडून‎ मैदानी खेळाकडे वळविण्यासाठी‎ प्ले ग्राउंड खेळाच्या साहित्याचे‎ वितरण करण्यात आले.

यात‎ प्रामुख्याने सीसॉ झोका, घसरगुंडी‎ यांचा समावेश आहे. ज्याप्रमाणे‎ झोका जितका मागे जातो तितकाच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तो पुढे येतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी‎ जीवनात कधी मागे पडलेच तर‎ खचून न जाता प्रयत्नरत राहून पुढे‎ जाण्यासाठी प्रयत्न करावे. झोका‎ खेळताना झोक्याकडून मिळणारा‎ संदेश मुलांनी कायम लक्षात‎ ठेवावा, असे बगडिया म्हणाल्या.‎

मंडळाच्या सदस्या प्रीती गिंदोडिया‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी पाठ्यक्रमाबरोबरच‎ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण‎ विकासासाठी मैदानी खेळ अतिशय‎ महत्वाचे असल्याचे सांगितले.‎ याप्रसंगी अग्रशक्ती बहु मंडळाच्या‎ सचिव शितल अग्रवाल, मेघा‎ बगडिया, सोनल अग्रवाल, मिता‎ पित्ती, मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक‎ पवन जोशी यांनी तर अनिता पवार‎ यांनी आभार मानले. यावेळी वंदना‎ सोनवणे, संतोष गंडाळ, बाबासाहेब‎ पवार, प्रभाकर सावंत, विष्णू पवार,‎ सुधीर वाघमारे, राजू डोंगरे,‎ रोहिदास राठोड, देवानंद वाघ आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...