आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबरीकरण:200 पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाने जोडले : लोणीकर

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर विधानसभा मतदारसंघातील २०० पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाच्या रस्त्याने जोडण्याचे भाग्य मला लाभले, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरीदेखील अनेक गावांना आहे तो रस्ता मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण पूर्ण केला. त्यामुळे कुठलेही राजकारण केले नाही.

मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव, तळणी येथे आयोजित डांबरीकरण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी शिवाजीराव खंदारे, गणेशराव खवणे, सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, नाथराव काकडे, दत्तात्रय कांगणे, नगरसेवक सचिन बोराडे, नारायण काकडे आदींची उपस्थिती होती.

जयपूर माळेगाव ते दिंडी मार्ग हा ४ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी मंजूर असलेल्या डांबरीकरणाच्या ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंठा तालुक्यातील महत्त्वपूर्ण रस्त्यांपैकी हा रस्ता असून या रस्त्यावर जयपूर एरंडेश्वर कोकरसा शिवनगिरी बेलोरा सरकटे वझर यासारख्या अनेक गावांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण होता. त्या रस्त्याचे दर्जेदार असे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी आमदार लोणीकर यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...