आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातच खराब हवामानामुळेही पिकाचे नुकसान झाले. तरीही आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीची उत्पादकता चांगलीच वाढली आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत बाजारात ५० हजार क्विंटल अधिक तुरीची आवक झाली आहे. आवक जास्त असूनही हमीभावापेक्षा ३०० ते ५०० रुपये अधिकचा दर मिळतो. जिल्ह्यात यावर्षी जवळपास सव्वा लाख हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. मात्र जुलैमध्ये सलग पावसामुळे अनेक ठिकाणी तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सलग पेरणी केलेल्या तूर पिकाचे नुकसान झाले असताना दुसरीकडे आंतरपीक म्हणून ज्या ठिकाणी तुरीची पेरणी करण्यात आली होती तेथे अधिकचे उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जालना बाजार समिती ५० हजार क्विंटल तुरीची अतिरिक्त आवक झाली. तुरीला कमाल भाव ७३०० तर किमान दर ५ हजार रुपयापर्यंत मिळत असून सरासरी दर ७०००रुपयापर्यंत आहे.
तर तुरीचे दर वाढणार जालना बाजार समितीत जालना जिल्हा व्यतिरिक्त शेजारच्या बीड, परभणी आणि बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत आहे. हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राची गरज वाटत नाही. परंतु सरकारने तुरीचा बंपर स्टॉक करण्यासाठी खुल्या बाजारातून तूर खरेदी केली तर तुरीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गतवर्षीपेक्षा अधिकची आवक गतवर्षी सहा डिसेंबर ६ डिसेंबर २०२१ पासून बाजारात तूर येण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी १० डिसेंबर २०२२ पासून बाजारात तूर येण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत २ लाख ११ हजार ६१६ क्विंटल तूर बाजारात आली असून तब्बल १४६ कोटी ७२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.