आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा:बालपंढरपूर दुधना काळेगावात पालखी सोहळा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बालपंढरपूर दुधना काळेगाव येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानतर्फे येत्या रविवारी (४ डिसेंबर) लोटांगण व पालखी सोह‌ळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत श्रींचा अभिषेक, ७ ते ८ वाजेपर्यंत महापूजा, दुपारी १ ते सायं. ६ वाजेपर्यंत लोटांगण, पालखी सोहळा रंगणार आहे. संस्थानकडून दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ७.३० ते १०.३० वाजेपर्यंत विष्णुसहस्रनाम व गीता पारायण भारत महाराज सुरासे वडगावकर हे करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ८ ते १० या वेळेत अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, सोमवारी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत विनायक महाराज यांचे खिरापतीचे कीर्तन तर मंगळवारी रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत संगीत भजनी मंडळाकडून जागर होईल.

बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ज्ञानेश्वर महाराज सुरासे यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल. दरम्यान, दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान ग्रामस्थ दत्त जयंती व लळिताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...