आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरी:केदारखेड्यात केदारेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक, भाविकांची हजेरी

केदारखेडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी केदारेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मार्गावरील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा, रांगोळी टाकून परिसर सुशोभित केला होता.

तसेच पालखी मिरवणूकीचे मनोभावें स्वागत करून औक्षण केले. यावेळी टाळ मृदुंगाचा गजर फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. पालखीचा समारोप केदारेश्वर मंदिरासमोर महाआरतीने करण्यात आला. मिरवणुकीत केदारेश्वर महाराज की जय हो या घोषणांनी परिसर दुमदुमूला होता. पालखीने गाव प्रदक्षिणा करून घरो घरी पालखीचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...