आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:पाणंद रस्ता कामास लोकवर्गणीतून प्रारंभ, आता बिकट वाट होणार सुकर;हिसोडा बुद्रुक ते जळगाव सपकाळ दरम्यान दीड किलोमीटरचा होतोय पाणंद रस्ता

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हिसोडा बुर्दुक ते जळगाव सपकाळ येथील पाणंद रस्त्याच्या दीड किलोमीटर कामाचा शुभारंभ लोकवर्गणीतून रविवारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून अडगळीत पडलेल्या पाणंद रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या भागातील शेकडो शेतकऱ्यांची बिकट वाट सुकर होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय आता पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून आमची मुक्तता होणार असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहे.

शेती विकासाला चालना देणारे प्रमुख साधन म्हणून पाणदं रस्त्याकडे बघितले जाते. परंतु मागील काही वर्षापासून भोकरदन तालुक्यातील पाणदं रस्त्याची वाट प्रचंड बिकट झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती विकासात मोठा खोडा निर्माण होत होता.अनेक तक्रारी करुन देखील काहीच उपयोग नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असे. पावसाळ्यात तर शेतात जायचे झाल्यास अनेक अडचणीचा सामना करीत शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असे. परंतु मागील दीड ते दोन महिन्यापासुन भोकरदन तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने मशीन आमचे डिजेल तुमचे या उपक्रमातुन पाणदं रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.

यामध्ये तालुक्यातील ६४ गावातील १५० पाणदं रस्त्यांचा समावेश आहे. तालुक्यात चार पोकलेन मशीनद्वारे पाणदं रस्त्याचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक गावातील पाणदं रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी चौफुलीवरील हिसोडा बुर्दुक ते जळगाव सपकाळ पाणंद रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील जवळजवळ शंभर शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार असुन सदर रस्त्यामुळे शेती विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले होते. रविवारी प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी तलाठी अरुण गावंडे, शेतकरी उखाजीं कोरडे, योगेश कोरडे, निवृत्ती कोरडे, जगन्नाथ बावस्कर, प्रकाश कोरडे, अर्जुन जगताप, शिवाजी सोनवणे, आत्माराम सोनवणे, निवृत्ती सोनवणे, आत्माराम कोरडे, राजु कोरडे, रामदास सुरडकर, सुनील कोरडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...