आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गोंधनखेडा ते भातोडी (शिव) या पाणंद रस्त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला आहे. यामुळे परिसरातील शेत वाट सुकर होण्यास मदत होणार आहे.
अनेक शेतकऱ्यांना या पाणंद रस्त्याने पावसाळ्यात चिखल तुडवीत शेत गाठावे लागायचे. यामुळे शेतात खते व इतर पेरणीचे साहित्य नेताना मोठी अडचण होत असे. यामुळे शेतकऱ्यांना हा पाणंद रस्ता असुन अडचण आणि नसुन खोळंबा असा असलेला हा पाणंद रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांच्याकडे लावून धरली होती. समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतुन शालिकराम म्हस्के यांनी स्वखर्चाने या १ किलोमिटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे काम नुकतेच सुरू केले आहे. या कामामुळे आता पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना यांची शेतवाट सुकर होणार असल्याने गोंधनखेडा व भातोडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमच्या सर्कलच्या अनेक शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा प्रश्न मिटला
गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासुन आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ताच नव्हता कुणाच्या शेतातुन जाव तर भांडण तंटे व्हायचे पाणंद रस्त्यामधुन तर पावसाळ्यात जा ये करण्याठी वाटच सापडत नव्हती. मग आम्ही शालीकराम म्हस्के यांच्याकडे या रस्त्याची समस्या मांडली तर त्यांनी आमची समस्या समजुन घेत लगेचच स्वखर्चातुन आम्हाला चांगला रस्ता बनवुन दिल्याने आमच्या या सर्कलच्या अनेक शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न मिटला असुन एक मोठा दिलासा मिळाला असल्याचे गाेंधनखेडाचे शेतकरी विष्णू गोरे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.