आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळावा:पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा येत्या 25 डिसेंबरपासून

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्फत २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे, असे कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी कळविले आहे.

काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवार यांना एका छत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा महास्वयंम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ईपीपी ट्रेनी, मशिन ऑपरेटर आणि नियमित रिक्तपदे यासाठी ऑनलाईन मुलाखती व्दारे भरती प्रक्रीया करण्यात येणार आहे.

यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या सुयोग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छुकांनी सेवायोजन नोंदणी केली नसल्यास संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी. असे कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...