आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पारध बु. येथे दर सोमवारी पहाटे होणार गणपती आरतीचा उपक्रम

पारधएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे सोमवारपासून गणपती मंदिरात पहाटे सहा वाजेला आरती घेण्याचा उपक्रम सोमवारपासून हाती घेण्यात आला आहे. येथील शेखर देशमुख यांनी सपत्नीक पहिली आरती घेत उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.

ह.भ.प. ज्ञानेश्र्वर माऊली शेलूदकर, ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते, महंत दौलतराम बाबा या मंडळीच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षांपासून पारध आणि परिसरातील जवळपास पंचवीस गावांमध्ये फिरती चतुर्थी आणि साप्ताहिक आरती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पारध बू येथे साप्ताहिक आरती येथील गणपती मंदिरात दर सोमवारी सकाळी सहा वाजता आरती करण्याचा संकल्प ह.भ.प. सास्ते महाराज, ह.भ.प. अंबादास महाराज यांच्या उपस्थतीमध्ये सोडण्यात आला.

या वेळी मार्गदर्शन करतांना ह. भ .प. सास्ते महाराज म्हणाले की, फिरती चतुर्थी आणि साप्ताहिक आरती या उपक्रमतून आपल्याला एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करता येईल आणि विशेष म्हणजे तरुण पिढीला परमार्थाची गोडी लागेल. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांनी केले. या वेळी शरद आबा देशमुख, अशोक लोखंडे, शेषराव शेषराव लोखंडे, एल. बी. लोखंडे, संजय लोखंडे, एन. एम. लोखंडे, सुरेश महाराज देशमुख, नामदेव लोखंडे, पवन लोखंडे, राजू गुरव, पवन जाधव, रतन काकरवाल, शंकर लोखंडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...