आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफादर डे हा पालकांचा आदर करणारा दिवस अंबड येथील व्हीएलडी स्कुलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांचा आदरतिथ्य केले. येथील व्ही.एल. डी इंग्रजी शाळेत फादर डे उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय वीरचंद लालजी धरमशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेचे संस्थापक सुरेश धरमशी, मुख्याध्यापिका गितल धरमशी, अशोक धरमशी, हिना धरमशी, अल्पा मोता आदींची उपस्थिती होती. यावेळी फादर डे विषयी बोलतांना पालक आणी पाल्यांशी हितगुज करतांना व्यवस्थापक वितेश धरमशी म्हणाले की, वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य आहे, ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखरेख करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे या दिवसाला महत्व दिले जाते. पुढे बोलतांना ते म्हणाले वडिलांचा त्याग, प्रेम, जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडते वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि भावना व्यक्त कारतांना मुलांनी आज पासून आपल्या आई वडिलांशी नेहमी आरदभाव ठेऊन वागावे फादर डेचे औचित्य साधून आई वडिलांच्या सानिध्यात असतांना आई वडिलांचे ऐकून आई-वडिलांचे नेहमी आशीर्वाद घेऊन् प्रत्येक मुलांनी आपले कार्य करावे तरच प्रत्येक मूल आपल्या जीवनात यशस्वी होईल असेही धरमशी शेवटी म्हणाले. यावेळी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यानं सोबत विविध खेळात भाग घेऊन आनंद लुटला प्रसंगी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा या दिना निमीत्त पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.