आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाता-पालक गटाचे कार्य विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रेरक असल्याचे प्रतिपादन रोहिलागड केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी केले. अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत माता पालक गटाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी वृषाली बीडकर, शिक्षण विस्तार अधिकारी चव्हाण यांच्यासह सरपंच करुणा पाटील, अश्विनी वैद्य, अश्विनी खरात, सुषमा पाटील, छाया टकले, ज्योती टकले, अनिता टकले, वैशाली जाधव, यमुना तार्डे, रंजना तार्डे, सीमा लोंढे, सोनाली टकले, अनिता वैद्य आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गंगावणे यांनी सांगितले, की रोहिलागड केंद्रांतर्गत रोहिलागड १६, किनगाव १४, चिकणगांव ३, माहेर भायगांव ६, देशगव्हाण ४, किनगाव वाडी ९, कौचलवाडी ९, निहालसिंगवाडी ६, जोगेश्वरवाडी ३, श्रीकृष्ण नगर २ अशा एकुण ७२ माता पालक गटाची स्थापना करण्यात आली आहे. गाव, वस्ती, वाडा, गल्ली, मोहल्ला, वस्ती पाडा, वार्ड, प्रभाग मधील लीडर माता द्वारे विद्यार्थी सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरत आहेत. निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान हा उपक्रम विद्यार्थी पालक व माता यांच्यासाठी खुप उपयुक्त व प्रेरक ठरत आहे. असे सांगितले.
सूत्रसंचालन अंजली माळोदे यांनी तर जयश्री गिरी यांनी आभार मानले. या महिला मेळाव्यात संगीत खुर्ची, उखाणे, देशभक्तीपर गीते, अभंग आदी स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्या मातांना बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी बबिता भस्मारे, वाघमारे, छाया जाधव, अहिरे, झांबरे, अरुण कास्तोडे, टकले, हुसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अर्चना तांबे, वर्षा पाटील, वनिता पाटील, माधुरी पाटील, शांता वैद्य, वैशाली तार्डे, सुनीता बरांडे, कविता बरांडे, शीतल मोरे, सीमा टकले, शीतल टकले, सोनल टकले, भाग्यश्री चंदनशिव, मनिषा पाटील, दीपाली पाटील, मलेखा इलियास, शेख रशिदा, सुवर्णा पाटील, सुषमा पाटील यांच्यासह परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.