आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, त्याच्याकडे ग्लॅमरस इव्हेंट\म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे वधू-वरांच्या पालकांची पॅकेज पद्धतीला पसंती मिळत आहे.
कोरोना काळानंतर आता विवाह धूमधडाक्यात होणार आहेत. त्यासाठी हा सोहळा खास व्हावा, यासाठी वर-वधू यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रयत्नशील असतात. लग्नमंडपाच्या सजावटीपासून फोटोशूट, लग्नात खमंग पदार्थ, रुखवंत बनविण्यापासून लग्नाचे आमंत्रण देण्यापर्यंतची सर्व व्यवस्था अगदी चोख करण्यासाठी पॅकेज पद्धतीला पसंती मिळत आहे, असे मंगल कार्यालय मालकांचे सांगणे आहे.लग्नाची खरेदी, मेहंदी, हळदीस समारंभाबरोबर लग्नस्थळी रोषणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनविण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे वेडिंग प्लॅनर किंवा पॅकेज सिस्टिम देण्यावर मंगल कार्यालय आणि लॉनचा भर आहे. वरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडा, वाजंत्री, बग्गी यांचीही मागणी पॅकेजमध्ये केली जात आहे. शाही विवाह सोहळ्याचे स्वप्न पालक या माध्यमातून पूर्ण करीत आहेत.
सध्या मथिम वेडिंगवर भर आहे. थिमनुसार डेकोरेशन, कपडे, दागिन्यांना पसंती असते. लॉनवर थिम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा उपलब्ध असते. हवे तसे डेकोरेशन करता येत असल्याने कार्यालयांपेक्षा लॉनवर लग्न करण्याचा ट्रेंडही हल्ली मोठ्या प्रमाणात दिसत आहे. थिम्सवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजे, फुलांच्यामाळा, सेल्फी पॉइंट, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजविण्यात येतात. महाराष्ट्रीय पद्धतीची पंचपक्वान्ने, वेलकम ड्रिक्स, रंगीबेरंगी मॉकटेल्स,पंजाबी, राजस्थानी, चायनीज, इटालियन, पाणीपुरी, बुफे याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, दरम्यान, रुखवत बनविण्यापासून ते गाडीसजविण्यापर्यंत आणि विवाह सोहळ्याचे आमंत्रण पाठविण्यासाठी सुद्धा पॅकेजमध्ये मागणी होत असल्याचे कैलास मंगल कार्यालयाचे संचालक राजेंद्र बाकलीवाल यांनीसांगितले.
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी पॅकेज सिस्टिम परवडणारी
मध्यमवर्गीय आई वडिलांना लग्नासाठी पॅकेज सिस्टिम परवडण्यासारखी आहे. यामुळे पालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास कमी आहे. त्यामुळे या पॅकज सिस्टिमसध्या पसंती मिळत आहे. आत्माराम गायकवाड, फोटोग्राफर
लॉन्सवर सेल्फी पॉइंटसह इतर सुविधा मिळतात
कोरोना काळानंतर उत्साह वाढला आहे. तुळशी विवाहानंतर लग्न समारंभास प्रारंभ झाला आहे. लॉनवर ऐसपैस जागा असते, सेल्फी पॉइंट, अन्य सुविधा असल्यानेलॉन्सला मागणी आहेे. राजेंद्र देशमुख, रत्नमाला लॉन्स मालक,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.