आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकडीचा विकास:45 लाखांच्या सीएसआर खर्चातून पारसी टेकडीचा होतोय विकास

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील पारसी टेकडीवर विविध विकास साधला जात आहे. टेकडीला केलेले तार कंपाउंड, ५० हजारपेक्षा जास्त लावलेली झाडे, घनवन प्रकल्प यामुळे हा परिसर पर्यटनस्थळासारखा होऊ लागला आहे. दरम्यान, कंपन्यांची पत व वार्षिक उलाढालीनुसार नफ्याच्या सरासरी २ टक्के भाग हा सामाजिक कामांसाठी वापरावा लागतो. या अनुषंगाने केशव सृष्टीच्या माध्यमातून एका कंपनी पारसी टेकडीवर ४५ लाखांचा निधी खर्च करीत आहे. आतापर्यंत या ठिकाणी ३५ लाखांचा खर्च झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या विकासासाठी जालनेकरांच्या श्रमदानाचीही त्याला साथ मिळत आहे.

जालना शहरातील फेज थ्रीजवळील पारसी टेकडी एक नव्या रूपात साकारत आहे. वृक्ष लागवड, तार कंपाउंड, टेकडीवर जाण्यासाठी रस्ता, पाणलोट विकासाची कामे, खदानीतून टेकडीवर आणलेले पाणी पावसाळ्यात झालेल्या वृक्ष लागवडीमुळे हा परिसर पर्यटनासारखा होऊ लागला आहे. एकीकडे कंपन्यांतून होत असलेले प्रदूषणामुळे जालनेकरांतून संताप व्यक्त होत आहे.

परंतु, दुसरीकडे शहराच्या कडेला टेकडीचा विकास होत असल्यामुळे जालनेकरांतून काही प्रमाणात का होईना समाधान व्यक्त होत आहे. या ठिकाणचे झाडे जीवित राहण्यासाठी कुंडलिका सिना रिव्हु वनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, समस्त महाजन ट्रस्ट यांच्यासह विविध सामाजिक संस्था, कंपन्या, उद्योजक, शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी विकास होत आहे. दर रविवारी विविध क्षेत्रातील नागरिक, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन जाऊन श्रमदान करीत आहेत. यामुळे याचा विकास होऊ लागला आहे. उद्योजक सुनील रायठठ्ठा, उदय शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा या विकासासाठी प्रयत्न सुरू आहे.

टेकडीच्या कडेने होणार बांबूची लागवड
टेकडीच्या खालच्या बाजूने व टेकडीच्या बाजूने बांबूची लागवड केली जाणार आहे. यामुळे ही टेकडी अजूनच रमणीय होणार आहे. चारही बाजूंनी तार कंपाउंड होत असल्यामुळे जनावरांनाही टेकडीवर जाता येत नाही. दर आठवड्याला होत असलेल्या श्रमदानामुळे लागवड झालेली वृक्ष जगण्याची शाश्वती आहे.

श्रमदानातून जगवले जाताहेत वृक्ष
सामाजिक संस्था म्हणून लागवड झालेली वृक्ष जगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह श्रमदान करण्यासाठी जालनेकरांची साथ मिळत आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा परिसर रमणीय व प्रेक्षणीय स्थळ झाल्यासारखा होईल.- उदय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, जालना.

बातम्या आणखी आहेत...