आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:अनुभव मंटप उत्सवात सहभागी व्हा : वांजुळे

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा बसवअण्णा यांनी अनुभव मंटपाची स्थापन केली. प्रतिवर्षाप्रमाणे २६ व २७ नोव्हेंबर रोजी बसवकल्याण, कर्नाटक येथे ४२ वा राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सावाला जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व लिंगायत समाजबांधव व बसव प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आव्हान महाराष्ट्र बसव परिषदेच्या वतीने प्रसार माध्यमांशी बोलताना राजेंद्र वांजुळे यांनी केले.

भारतभर विखुरलेला हा समाज आणि सर्व समतावादी विचारधारा एकत्र याव्यात या उदात्त हेतूने गत ४२ वर्षांपासून पूज्य अप्पाजी प्रतिवर्षी ‘राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सव’ आयोजनाची परंपरा जोपासत आहेत. हा उत्सव दोन दिवस चालणार असून शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. षट्स्थल ध्वजारोहण सकाळी ११ वा. उद्घाटन समारंभ, दुपारी ३ वा. चिंतन सभा आणि या वेळी मराठीतील ८ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. रविवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सामूहिक इष्टलिंग योग सकाळी ११ वाजता मराठी व्याख्यान सत्र, दुपारी ३ वा. समारोप समारंभ संपन्न होईल. मराठीतील ८ ग्रंथांचे हा उत्सव म्हणजे मानवी स्वातंत्र्य, समानता आणि विश्वबंधुत्व ही आपल्या संविधानाने बहाल केलेल्या मूल्यांचा उत्सव होय.

हा उत्सव समाज व राष्ट्राच्या विकासास प्रेरक व्हावा म्हणून देशभरातील अनेक सत्यसंशोधक, विचारवंत, साहित्यिक, धर्मचिंतक आणि राजकीय मान्यवर यांना आमंत्रित केले आहे. या दोनदिवसीय कार्यक्रमात समतातत्त्वाधारीत भव्य भारताचे निर्माण करण्यासाठी चिंतन-मंथन होणार आहे. तरी आपण या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक राजू जुबरे व राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...