आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तीर्थपुरी येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 75 शाळांचा सहभाग

तीर्थपुरी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समिती घनसावंगी शिक्षण विभागाअंतर्गत ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तीर्थपुरी येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये भरवण्यात आले. यात तालुक्यातील ७५ शाळांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले.या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना विज्ञान विषयाचे अधिव्याख्याते प्रा. डॉ. संजय येवते, गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. कैलास जारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब उढाण, पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, नगरसेवक डॉ. प्रवीण कडुकर, सतीश पवार, सचिन चिमणे, रमेशचंद्र बोबडे, भरत साबळे, सुनील कोरडे, प्रकाश परदेशी, केंद्रप्रमुख श्रीमंत घायतडक, विषयतज्ज्ञ प्रल्हाद सोलाट, खेमाडे, चौधरी, शिंदे, डोंगरदिवे, सोनवणे, कासार आदी उपस्थित होते.

यात उच्च प्राथमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक शंकरराव पाटील प्रशाला कुंभार पिंपळगाव शाळेचे श्रवण तौर, प्रवीण, मयूरी तौर, राहुल या विद्यार्थ्यांनी मिळवला, द्वितीय क्रमांक एल. एस. इंग्लिश स्कूल तीर्थपुरी येथील अक्षय कैलास जारे, आदर्श खरात, अभयराज बोबडे, ज्ञानेश्वर बोबडे तसेच तृतीय क्रमांक सरस्वती भुवन हायस्कूल रांजणी येथील कृष्णा शिंदे यांनी मिळवला आहे. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक कुंभार पिंपळगाव येथील एस. बी. हायस्कूलच्या धीरज उद्धव राठोड याने मिळवला, द्वितीय क्रमांक मूर्ती येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिवराज शिंदे, प्रशांत शिंदे तसेच तृतीय क्रमांक बोधलापुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश जाधव, अंकुश व सय्यद फैजान यांनी पटकावले, उत्तेजनार्थ बक्षीस देवी दहेगाव येथील देवी रेणुकामाता माध्यमिक विद्यालयातील रवी शिंदे, महादेव यांना मिळाले आहे. तसेच प्राथमिक शिक्षक विभागांतर्गत शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक येवतीकर, माध्यमिक शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक अंभुरे, प्रयोगशाळा सहायकमधून प्रथम क्रमांक सुरसे यांना मिळाला. बक्षिसपात्र सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...