आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा७५ वर्षांची परंपरा असलेल्या टेंभुर्णीतील दत्तयात्रेला प्रारंभ झाला असून त्या निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. यात्रेत चंदन छाया कोचिंग क्लासेसचा ढोल पथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
पालखी मिरवणूकीत ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने सरपंच सुमनताई म्हस्के यांनी ढोल पथकाचे नियोजन केले होते. तर येथील गुरुदत्त ब्रास बँडच्या वाद्य वृंदाची मोफत सेवा सालाबादप्रमाणे देण्यात आली. दत्तात्रय जन्मानंतर निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने दत्त यात्रेला प्रारंभ होतो. यावर्षी दत्तयात्रेत उत्साह वाढण्यासाठी ग्राम संसद कार्यालयाने पुढाकार घेतला असून विविध प्रकारचे खाद्य स्टॉल, रहाटपाळणे आले आहेत.
पालखी सोहळ्यामध्ये संस्थानचे अध्यक्ष देवराव देशमुख, सचिव रामदेव, संचालक बालाजी जोशी, प्रा. दत्ता देशमुख, महादू भागवत, सुभाष काबरा, प्रशांत काबरा यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य शालिकराव म्हस्के, पुष्पाताई म्हस्के, भाजपा शहराध्यक्ष राजू खोत, गौतम म्हस्के, पूनम भट, रामधन कळंबे, संजय राऊत, ज्ञानेश्वर उखर्डे, प्रदीप काबरा, धीरज काबरा यांच्यासह भाविकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान या दिंडी सोहळ्यामध्ये जय मल्हार भजनी मंडळ, दत्त सेवा भजनी मंडळ, चंदन बाबा भजनी मंडळ, जगदंबा भजनी मंडळ, पंचमुखी महादेव भजनी मंडळ, झटूबा महाराज भजनी मंडळ, जय दयानंद दरबार भजनी मंडळ, गणेशपुर भजनी मंडळ, तपोवन गोधन भजनी मंडळ, संतोष घोडके, कैलास मगर, अमोल चंदनशिवे आदींनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.