आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा, खान्देश, विदर्भाला जोडणाऱ्या अजिंठा-बुलडाणा या राष्ट्रीय महामार्गावरील भोकरदन तालुक्यातील धावडा बसस्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने येथील प्रवाशांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या अजिंठा ते बुलढाणा राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण झाले. तेव्हा बस स्थानकापासून दूरवर एक छोटासा टिन पत्राचा प्रवासी निवारा बनविला आहे. परंतू, तेथे बस थांबत नसल्यामुळे प्रवाशी जात नाही.
१५ कहजार लोक वस्तीच्या या धावडा गावातून व परिसरातील पोखरी, वडोद तांगडा, सेलूद, लिहा, भोरखेडा मेहगाव, वडाळी, टाका वस्ती, विझोरा, वाढोणा, वालसावंगी, पद्मावती यासह विविध बारा गावांतील प्रवाशी याच ठिकाणाहून ये-जा करीत असतात. तसेच गावातील प्रवासी व्यापारी, विद्यार्थी , शेतकरी रोज बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर, मुंबई, धुळे, चाळीसगाव, भुसावळ, सिल्लोड, भोकरदन येथे दररोज व्यापारासाठी व शेतीमाल विक्रीसाठी व विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी ये जा करीत असतात. तसेच येथून जवळच असलेल्या अजिंठा लेणी, गजानन महाराज चे शेगाव, लोणार सरोवरसाठी ही पर्यटक व जवळच असलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी जाळीचा देव येथे भाविक येथूनच ये जा करण्याकरीता प्रवाशांची वर्दळ असते. परंतू, या ठिकाणी प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना हॉटेल समोर थांबून बसची प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा भरधाव वेगातील वाहणांची धडक बसण्याची भिती निर्माण होते.
फाट्यांवरही निवारा नाही अजिंठा -बुलडाणा मार्गावर भोकरदन तालुक्यातील भोरखेडा, धावडा, विझोरा, वाढोणा व जाळीचा देव या पाचही गावाच्या स्थानकावर जेथे बस उभी राहते. तेथे प्रवाशी निवारा नसल्याने या सर्व ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहे. या सर्व ठिकाणी जेथे बस थांबत आहे. तिथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुसज्ज प्रवासी निवारा व स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी सोमनाथ घोडकी, प्रविण गांधीले, नंदु जाधव, दिलीप पेंटर,आहेमद मिस्त्री, नाना तेलंग, राजुअप्पा घोडकी, शेख आरिफ, दिलीप सनान्से आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.