आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेची ऐशीतैशी:जालना बसस्थानकात चोरटे, मद्यपींकडून प्रवाशांची लूट; पोलिस सुरक्षा मिळेना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसाला १ हजार ३०० बसेस तसेच हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या जालना बसस्थानकावर सुरक्षेची ऐशीतैशी झाली आहे. चारही बाजूने वाट मोकळी झालेल्या बसस्थानकात मद्यपी, पाकीटचोरांची दहशत वाढली आहे. गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी, दागिने लंपास करणे तसेच प्रवाशांचे फोन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तक्रार कराव,ी तर कुणाकडे असा प्रश्न प्रवाशांना असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसही उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशला लालपरीने जोडणाऱ्या जालना स्थानकावरून दिवसाला तब्बल १ हजार ३०० गाड्यांची येजा होते. येथून मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, बुलडाणा, लातूर, नांदेड अशा सर्वच ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी प्रवास करण्यासाठी बसेस मिळतात.

यामुळे प्रवाशांची भिस्त लालपरीवर आहे. जिल्ह्यातील मोठे अन् महत्वाचे स्थानक म्हणून जालना बसस्थानकाकडे पाहिले जाते. अशा या वर्दळीच्या ठिकाणी मात्र, प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी बसेसची संख्या अधिक असल्याने मोठी गर्दी नेहमीच असते. प्रवाशांची संख्याही माेठी असल्याने उतरणे तसेच बसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची एकावेळी गर्दीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे गर्दीचा फायदा घेत चाेरटे पाकीटमारीची कामे करत असल्याचा प्रकार नियमीतचे झाले आहे. ही बाब थांबवण्यासाठी पुर्वी प्रमाणे पेालिसांची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कोरोनापुर्वी जालना स्थानकावर नियमीत दोन पेालिसांची या ठिकाणी नेमणुक करण्यात आली होती. आताही या ठिकाणी नेहमीसाठी वर्दीवरील पोलिसांची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चोरट्यांची दररोजी हजेरी, प्रवासी वैतागले : जालना स्थानकावर दररोज दिवसभरात दोन किंवा तीन मद्यपी चोरी करत असल्याची तक्रार घेऊन प्रवासी एसटी महामंडळाच्या कन्ट्रोल पॉईंटवर येतात. या बाबत पोलिसांना संपर्क करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या ठिकाणी नोंद करण्यासाठी पोलिस चौकीत सूविधा नसल्याने अनेकजण तक्रार करण्याचेही टाळतात. दररोज एकतरी मद्यपी चोरटा या ठिकाणी आढळून येत आहे. अशांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सुरक्षा रक्षकांनाही दमदाटीचे प्रकार :
जालना बसस्थानकावर कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षाकांच्या ताब्यात प्रवाशांनी चोरट्याला दिल्यास चोरट्यांकडून त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार होत आहे. यामुळे अशा चोरट्यांना पोलिसांच्या खाकी ची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे.

नाहकचा होणारा वाद मिटवण्यासाठी पोलिस हवे
बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याचा फायदा खिसेकापू, बॅग चोरी करणारे, मोबाइल चोरटे घेत आहेत. शिवाय विनाकारण निर्माण होणारे वाद मिटवण्यासाठी या ठिकाणी नेहमीसाठी पोलिसांची गरज आहे. नियंत्रण कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्यांना या बाबींना तोंड द्यावे लागते. यामुळे या ठिकाणी पोलिस सुरक्षेची गरज असल्याचे नियंत्रक पी.टी. करवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...