आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या तिकीट दरातील सवलतीचा लाभ घ्यावा : राजपूत

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीला आता सुगीचे दिवस आले असून शिवशाही या वातानुकुलीत बसमध्ये जेष्ठ नागरीकांना ४५% भाड्याची सवलत तसेच एसटीच्या इतरही प्रवासभाडे सवतीचा लाभ दिला जात असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाफराबादचे आगारप्रमुख आर. बी. राजपूत यांनी केले आहे.

जाफरबाद बसस्थानकात एसटीचा ७४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एसटीची पूजा करुन प्रवाशांना पेढे, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेल्या ७४ वर्षापासुन ही एसटी अविरतपणे सेवा सुरु आहे. कोरोना नंतर व एसटी कर्मचारी संपानंतर तिला आता सुगीचे दिवस येत आहेत.

उत्पन्नात देखील दिवसेंदिवस वाढ झालेली दिसुन येत आहे. जाफराबाद आगाराला दोन शिवशाही या वातानुकुलीत बसेस मिळाल्या असुन या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरीकांना ४५ टक्के भाड्याची सुट दिली जाते. आज एसटीमध्ये अमुलाग्र प्रगती झालेली असुन या आगारात ३ एशियाड, २ शिवशाही वातानुकुलीत काही निमआराम व साध्या तथा मानव विकासच्या बसेस अशा एकुण ५२ बसेस उपलब्ध आहेत. प्रवाशांनी खासगी प्रवास टाळून एसटीने प्रवास करुन आपल्या जिवाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे राजपूत म्हणाले. यावेळी पी. डी. पाटील, एस. जे. पंडित, पी. जे. कुलकर्णी, एन. बी. फदाट, व्ही. एस. अंकुशकर, वाघ, कोरडे, शे.साबेर आदी उपस्थित होते. यावेळी आंब्याच्या पानांचे तोरण, केळीचे खांब, रांगोळी, पताका, एसटी वर्धापन दिनाचे बँनर्स तसेच पुष्पहारांनी बसस्थानक सजविण्यात आले होते. यावेळी विजय कळंबे, गजानन सरडे, रंधवन, गजानन उबाळे, डॉ.मार्तड, रामु उबाळे, अमोल कोलते, मंगेश लोखंडे, विकास मरकड, गणेश राऊत, अनिल छडीदार, धनंजय ढवळे, शे.शकील, सुमेध आराख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...