आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किडनी विकारग्रस्त रुग्णांनी नि:शुल्क डायलिसिस सेवेचा लाभ घ्यावा

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांचे प्रतिपादन, जागतिक किडनी दिन साजरा

डायलिसिस विभागातील सुविधा निशुल्क असुन किडनी विकार असणाऱ्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले. जिल्हा रुग्णालयांमध्ये १५ मार्च रोजी ‘जागतिक किडनी दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाड्याचे पहिले किडनी विकार तज्ज्ञ तथा ज्येष्ठ किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर, सामान्य रुग्णालय जालना, डायलिसिस विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बांदल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश पाटील डॉ. आशिष राठोड , डॉ. सुरज तौर, डॉ. अतुल पायाळ, डॉ. संतोष जायभाये, डॉ. पंडित शिरसाट आदी उपस्थित होते. किडनी विकार तज्ज्ञ डॉ. सुहास बाविकर यांनी किडनी विकार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पद्धती आदीबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रशांत बांदल म्हणाले, सप्टेंबर २०१३ मध्ये सुरु झाले असुन आतापर्यंत डायलिसिस विभागामध्ये ५ हजार ४१३ रुग्णांवर डायलिसीस केले आहेत. १ हजार ५०० रुग्णांना डायलिसिस कॅथेटर किंवा सेंट्रल लाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन ४५ रुग्णांना ए व्ही फिस्टुला सर्जरी करण्यासाठी डायलिसिस विभागातर्फे मदत करण्यात आली आहे. तसेच २० ते २५ रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करुन त्यांना आवश्यक ते सहकार्य केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकिरण वाघमारे यांनी केले. डायलिसिस विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश पाटील डॉ. आशिष राठोड, डॉ. सुरज, डॉ. अतुल पायाळ, मुख्य परिचारिका जोशी, राजकिरण वाघमारे, राहुल शेलार, छाया नागरे, प्रीती वाघमारे, रितेश पारधी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. यावेळी किडनी प्रत्यारोपण झालेल्या डॉ. बहुरे, उघडे, ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन राजकिरण वाघमारे यांनी तर डॉ. सर्वेश पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...