आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील श्रध्दा एनर्जी अँड इन्फ्रा प्रोजेक्ट मॉ बागेश्वरी साखरी कारखान्याच्या खोडवा व लागण ऊसाच्या नोंदी कुठल्याही अटी व शर्ती विना घ्याव्यात व गाळप हंगाम २०२१-२२ चे पेमेंट एफआरपी प्रमाणे एकरकमी देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
गाळप हंगाम २०२०-२१ व गाळप हंगाम २०२१-२२ या हंगामात जी जळीत ऊस बील कपात केली ती तत्काळ देण्याचे आदेश श्रध्दा एनर्जी अँड इन्फ्रा प्रोजेक्ट मॉ बागेश्वरी साखरी कारखान्याच्या संचालकाला द्यावेत. शेतीकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. सतत पडणारा पाऊस व शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामध्ये शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. तसेच खोडवा व लागण ऊसाच्या नोंदी कुठल्याही अटी व शर्ती विना घ्याव्यात व गाळप हंगाम २०२१-२२ चे पेमेंट एफ.आर.पी. प्रमाणे एकरकमी देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.