आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधी खर्च:हृदयरुग्णास औषधी खर्च, नुकसान भरपाई द्या'

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँजिओग्राफी व औषधी देयके सादर करूनही विमा परताव्याची पूर्ण रक्कम न देणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सादर केलेल्या देयकांतील रकमेसह तक्रार खर्च देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा कंपनीस दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आयोगाने संजय वझरकर यांचा अर्ज मंजूर करत त्यांना २९ हजार ९९३ रुपये रक्कम तसेच नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये एवढी रक्कम ४५ दिवसांच्या आत विमा कंपनीने द्यावी व मुदतीत न दिल्यास द. सा.द.शे. १० % व्याज द्यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्या मंजूषा चितलांगे, नीता कांकरिया यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...