आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ट्रॅक्टरची संरक्षित रक्कम द्या; ग्राहक आयोगाचे आदेश

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक तांत्रिक कारणावरून विमा नामंजूर करणाऱ्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला असून शेतकऱ्यास विमा संरक्षित मुल्य ( आय. डी. व्ही.)नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत.काजळा ता. जालना येथील शेतकरी बाबासाहेब भोर्डे यांनी ट्रॅक्टर खरेदी करून युनायटेड इन्शुरन्स कंपनी मार्फत रक्कम भरून ८ सप्टेंबर २०२० ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी ट्रॅक्टर चा विमा उतरविला. २५ जानेवारी २०२१ रोजी उटवद येथून त्यांचे ट्रॅक्टर चोरीस गेले.

मौजपुरी पोलिस ठाण्यात भोर्डे यांनी तक्रार दाखल केली. मात्र पोलीसांनी शोध लागेल या आशेवर पाच दिवस उशीराने गुन्हा दाखल केला. त्यानंतर भोर्डे यांनी विमा परतावा मिळण्यासाठी कंपनी कडे संपूर्ण दस्तऐवजासह अर्ज केला. मात्र विमा कंपनीने प्रथम खबर अहवाल उशिरा नोंदवला आणि कंपनीस विलंबाने कळवले, अशी कारणे देत विमा नामंजूर केल्याने अखेर बाबासाहेब भोर्डे यांनी ॲड. मयूर ढवळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवली.

अर्जात नमूद मुद्द्यांचा विचार करत आयोगाने वाहनाची विमा कंपनी ने संरक्षित केलेली 03 लाख 60 हजार रुपये रक्कम , तसेच झालेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी ५ हजार रुपये भरपाई ४५ दिवसाच्या आत द्यावेत, मुदतीत रक्कम न दिल्यास दहा टक्के व्याजदराने रक्कम अदा करावी. असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्या मंजुषा चितलांगे, नीता कांकरिया यांनी विमा कंपनीस दिले आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.मयूर ढवळे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...