आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लायन्स क्लबतर्फे पीस पोस्टर स्पर्धा

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स इंटरनॅशनलतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या “पीस पोस्टर “स्पर्धा अर्तंगत या वर्षीची थीम “लीड विथ कंपेशन “ या विषयावर श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या (मा.) विद्यालयात घेण्यात आली. यात प्राची ठाकुर हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. या चित्राची प्रांत स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली. प्राची ठाकूर हिला मुख्याध्यापिका गायत्री शुक्ला, प्रांतपाल एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले .

तसेच इतर सहभागी स्पर्धकांना क्लब तर्फे भेटवस्तु देण्यात आली. क्लबतर्फे १०० वह्या शाळेतील गरजु मुलींना देण्यात आल्या. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष राजेश फदाट, आनंद वाघमारे, पवन देशमुख, सतीश संचेती, दिपाली मित्तल, रुपम बिनीवाले, मिनाक्षी अडबलवार, अर्चना लोखंडे, राजेश देशपांडे , चंद्रकात दायमा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...