आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायतच्या ६ प्रभागातील १७ सदस्य असलेल्या आष्टी ग्रामपंचायतीसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सरपंचासाठी सात तर सदस्यांसाठी ७३ असे एकूण ८० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. त्याचा निकाल मंगळवारी लागणार आहे.
मागील दहा बारा दिवसांपासून आष्टी ग्रामपंचायतीच्या रणधुमाळी चालू होती. यंदाच्या निवडणुकीत तरुण वर्ग सहभागी झाल्याने घराणेशाहीचा वारसा जपणाऱ्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. यात तालुक्यातील आजी - माजी आमदार ही मागे नव्हते. यांनीही गावात फेऱ्या घेऊन नागरिकांना आम्हालाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. सकाळपासून मतदार घराबाहेर पडतील या आशेने उमेदवार व कार्यकर्ते मतदान केंद्रावर सर्व तयारी निशी ठाण मांडून बसले होते. परंतु १० वाजेपर्यंत मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
११३३१ एकूण मतदानापैकी ८२५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ७३ टक्के मतदान झाल्याचे आष्टी झोनल अधिकारी महेश काळे यांनी सांगितले. गावातील १७ मतदान केंद्रावर सुमारे १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परिसरातील लोणी, रायगव्हाण, हास्तूर तांडा, ढोकमाळ तांडा, चांगतपूरी, गोळेगाव, आनंदगाव फुलवाडी, ठोंबरे टाकळी या गावात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. विशेष लोणी येथे आपल्या जन्मगावी राहूल लोणीकर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. विशेष आष्टी मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा निवडणूक डॉ. अनंत गव्हाणे यांनी भेट दिली. तर पोलिस प्रशासनाकडून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि संदिप सावळे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.