आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:भोकरदन तालुक्यात 30 ग्रामपंचायतीत शांततेत मतदान; राजूर लढतीकडे लक्ष

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यात ३० ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान संपन्न झाले सर्वांचे लक्ष लागलेल्या राजूरलाही शांततेत मतदान झाले अशी माहिती भोकरदन च्या तहसीलदार सारिका कदम यांनी दिली .

३० ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदांच्या निवडीसाठी सकाळी साडेसातला ९५ मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी साडेदहा वाजेपर्यंत जवळपास ४५ ते ५० टक्के मतदान पूर्ण झाले होते. मतदारांमध्ये महिला मतदारांनी सर्वात लवकर मतदान केले. ग्रामपंचायतचे मतदान असल्याने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ८० ते ९० टक्के मतदान करून घेण्यावरते दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी भर दिलेला दिसून आला.

वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नातेवाईक मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले. सकाळी साडेसातला सुरू झालेले मतदान संध्याकाळी साडेपाच वाजता शांततेत संपन्न झाले काही ठिकाणी किरकोळ वादावाद झाले, तेवढे वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. तालुक्यातील करजगाव ,वरुड बुद्रुक ,मोहळाई, गोकुळ राजुर ,सावंगी अवघडराव ,जवखेडा खुर्द, जवखेडा बुद्रुक, देहेड , नांजा क्षीरसागर ,वालसा खालसा, गव्हाण संगमेश्वर ,वालसा डावरगाव, तपोवन तांडा, पिंपळगाव बारव ,पळसखेडा ठोंबरे, पळसखेडा दाभाडी ,मासनपुर चोराळा, निंबोळा, वडशेद, ताडकळस शेलुद, रेलगाव, कोठारा जयनपूर , जयदेव वाडी, कोठा कोळी, पिंपरी पद्मावती, लतीपुर, फुलेनगर, एकेफळ या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.

राजुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजुरेश्वर ग्रामविकास पॅनलच्याविद्यमान सरपंचाच्या पत्नी प्रतिभा भुजंग व महागणपती राजुरेश्वर विकास पॅनलच्या शांताबाई पुंगळे यांच्यामध्ये थेट सामना झाला. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. तालुक्यातील जाईदेववाडी येथे सरपंच पदासाठी सात उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. प्रशासन व पोलिसांनी सर्वतोपरी मतदान केंद्रावरती योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवला. निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी दहा वाजता भोकरदन येथे नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात होणार आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील २४२८ पैकी पुरुष ९७२ महिला ८५९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७५.४१ एवढी होती.

तळणीत मतदानाची टक्केवारी वाढली
मंठा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळणी येथे निर्वीघ्न मतदान पार पडले ८० टक्के आसपास मतदान झाल्याने उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. बाहेरगावावरुन आलेल्या मतदारामुळे चांगलीच रंगत पाहावयास मिळाली. सर्वच उमेदवारानी बाहेरगावी असलेल्या मतदाराना बोलावून मतदार करून घेतले गावात कुठलेही गट तट नसल्याने शांततेत मतदान पार पडले. गैरसोय झाली पाच वार्डा पैकी चार वार्डाचे मतदान वेळीच पार पडले तर वार्ड क्रमांक १ मध्ये मतदाराची रांग असल्याने उशीरा पर्यन्त मतदानाचा हक्क मतदारानी बजावला. मंठा पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

बातम्या आणखी आहेत...