आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचे मिशन‎ आणि व्हिजन सकारात्मक असावे‎

जालना‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधीही शैक्षणिक क्षेत्रात काम‎ करणाऱ्या लोकांचे मिशन आणि‎ व्हिजन सकारात्मक असावे लागते.‎ तरच समाजाचा योग्य पद्धतीने‎ शैक्षणिक विकास होऊ शकतो,‎ असे प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी‎ सांगितले.‎ जालना येथील श्रीमती दानकुंवर‎ महिला महाविद्यालयात डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे‎ सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांचा‎ सत्कार करण्यात आला.

यावेळी ते‎ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे‎ अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता तर‎ व्यासपीठावर संजय अग्रवाल, नरेश‎ अग्रवाल, प्राचार्य डॉ. विजय‎ नागोरी, उपप्राचार्या डॉ. विद्या‎ पटवारी आदींची उपस्थिती होती.‎ प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष‎ शिक्षण महर्षी स्व. कुंदनलालजी‎ अग्रवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार‎ घालून अभिवादन करण्यात आले.‎ अध्यक्षीय समारोपात महेंद्रकुमार‎ गुप्ता यांनी कोणतेही काम एका,‎ दोघांनी होत नसतं तर ते संपूर्ण‎ टीमनेच करावे लागते, असे‎ सांगितले. यावेळी विद्या पटवारी,‎ संजय अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त‎ केले. सुत्रसंचालन डॉ. विद्या‎ पटवारी यांनी केले. यावेळी प्रा.डाॅ.‎ जितेंद्र अहिरराव यांच्यासह‎ प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,‎ विद्यार्थिनी उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...