आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा ई -उद्घाटन:अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी समन्वय साधत सुधारणा करावी

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याची सध्या झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी समन्वयाने आपले गाव व शहराची सुधारणा करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील विकासाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचा ई-उदघाटन सोहळा पोलिस मुख्यालयातील क्रीडा मंत्री दानवे यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ७० गावात ६६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या नळपाणी पुरवठा योजनांचा ई-उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, सुदामराव सदाशिवे, वसंत जगताप, भागवत बावने, मधूकर गाडे आदींची उपस्थिती होती.

दानवे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून आपले गाव सुधारण्यास प्रथम प्राधान्य देवून जालना जिल्हा विकासाच्या मार्गावर सतत मार्गस्थ ठेवावा. शेतकरी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता इतरही क्षेत्रात आपला रोजगार निर्माण करुन आर्थिक स्वयंपूर्ण होण्यावर भर द्यावा, असे सांगून शेततळे, गटशेती, दालमील, जोडधंदा आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी. आज ७० गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांचा ई-उदघाटन सोहळा संपन्न झाला आहे.

‘हर घर नल हर घर जल’ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ५५ लिटर शुध्द पाणी नळाद्वारे दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी या योजनेची माहिती घेवून होणारे काम योग्य व कायमस्वरुपी होण्यासाठी गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ग्रामस्थांनी आपल्याला मिळणाऱ्या शुध्द पाण्यासाठी पाणीपट्टी नियमित भरुन सहकार्य करावे, असे आवाहन करुन उपलब्ध पाण्याचा योग्य व प्रमाणात वापर करावा. असे जिल्हाधिकारी डॉ.‍विजय राठोड यांनी सांगितले. कार्यक्रमास अधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅपचे लोकार्पण
जालना जिल्हा परिषदेकडून नळपाणी पुरवठा योजनांच्या कामावर तंत्रज्ञानाच्या जोडीने नियंत्रण व वेळेत काम पार पाडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. जलजीवन मिशन जि.प.जालना नावाचे ॲप विकसित करणारी जालना जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. या मोबाईल ॲपमध्ये शहरी भागात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन ॲपवर काम करणे शक्य आहे. यात तालुका, योजनानिहाय प्रगती दिसेल. भौतिक व आर्थिक कामांची ॲनालिटीक्स व ग्राफीकल रिपोर्टस तयार होतील ज्यावरुन एकंदरीत जिल्ह्यातील योजनांची प्रगती बघणे शक्य होईल. कामे पूर्ण करण्यास ‍विहीत कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असल्यास कंत्राटदारास एसएमएसद्वारे कळविणे शक्य असेल अशी ॲपची ठळक वैशिष्टे आहेत

बातम्या आणखी आहेत...