आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारासेयोच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत असल्याचे नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांनी सांगितले. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो शिबीरास खापरखेडा येथे प्रारंभ झाला. शिबीराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होते. यावेळी गजानन उदावंत, सरपंच शिलाबाई हिवाळे, दत्तू गवळी, समाधान गवळी, पंडितराव गवळी, राजू गवळी,भुजंगराव गवळी, माजी सैनिक गुलाबराव गवळी, उत्तमराव गवळी, गणेश मिस्तरी, शंकर गवळी आदींची उपस्थिती होती.
डॉ.सुरेखा लहाने म्हणाल्या,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून समाज जनजागृती असेल, व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल,//"बेटी बचाव बेची बेटी पढाव//"अभियान राबवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी नुसतच अर्थकरण किंवा नुसतच मोबाईल करण न करता समाजकारण राजकारण आणि व्यक्तिमत्व विकास या सर्व गोष्टींवर व्यवस्थितरित्या लक्ष केंद्रित करून आपला सर्वांगीण विकास साधवा. गजानन उदावंत यांनी सांगितले, ग्रामस्वच्छता अभियान, ग्राम विकास, संपूर्ण साक्षरता अभियान या विषयांवर राष्ट्रीय सेवा योजनेत विभागाच्या माध्यमातून सखोल विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण स्वच्छता अभियान काळाची गरज,या विषयावर मार्गदर्शन केले. आपण शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नुसत्याच पैसे उकळण्यापुरत्या या ठिकाणी उचलतो, आणि त्याचा कुठल्याही प्रकारे व्यवस्थित रित्या उपयोग करत नसल्याचा खंत व्यक्त करुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावावे. असे आवाहन केले. सुत्रसंचालन प्रा. जी. एस. लांडगे यांनी तर प्रा. जी. आर. गोफणे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.