आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमजीएम युनिव्हर्सिटीत यंदापासून फार्मसी आणि इंजिनिअरिंग या दोन अभ्यासक्रमांना एकत्र करून ‘फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग’ हा चार वर्षांचा कोर्स सुरू केला आहे. बारावीत पीसीएममध्ये ५० टक्के गुण आणि सीईटी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. हा मराठवाड्यातील पहिलाच अभ्यासक्रम आहे.फार्मसी अभियंत्यांची कमतरता असल्यामुळे फार्मसी उद्योगाला कुशल मनुुष्यबळ मिळत नाहीये. वैद्यकीय क्षेत्राच्या सपोर्टसाठी फार्मसी हा महत्त्वाचा विषय समजला जातो. पण, औषधनिर्माणशास्त्रातील उपकरणांची निर्मिती करणाऱ्या अभियंत्यांचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येतो.
पूर्वी औषधनिर्माणशास्त्रातील सर्व कोर्सेसमधील २५ विषयांत फक्त एकच फार्मसी इंजिनिअरिंगचा पेपर शिकवला जात होता. मुंबईतील आयसीटी म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे फार्मसी इन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम शिकवला जातो. ‘बीटेक इन फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग’ या कोर्सच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची शक्यता आहे.
नियंत्रित वातावरणात विविध औषधांचे संशोधन, उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, विविध आजारांसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि उपकरणांची कमीत कमी वेळेत निर्मितीसाठी हा कोर्स मत्हत्वाची भूमिका बजावू शकतो. रासायनिक प्रक्रिया, त्याच्या प्रयोगाला लागणारे तंत्रज्ञान, उपकरण निर्मितीचे इन डेप्थ प्रशिक्षण कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.