आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:डुकरी पिंपरी सरपंचपदी जनाबाई  मगर; उपसरपंचपदी चौधरी बिनविरोध

विरेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सरपंचपदी जनाबाई शिवाजी मगर, तर उपसरपंचपदी शकुंतला बालासाहेब चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. एन. कळकुंबे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी प्रियंका शिंदे, ग्रामसेवक अमरदिप डोइफोडे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास तांगडे, प्रल्हाद गायकवाड, रेखा मस्के, हरीभाऊ राऊत, मनसे तालुकाध्यक्ष कृष्ण खलसे, युवासेना विभाग प्रमुख दीपक खरात आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...