आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भोकरदन येथे जागृत देवस्थान श्रीखंडोबा महाराजांचा यात्रोत्सव

भोकरदन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जागृत देवस्थान श्रीखंडोबा माहाराज संस्थानच्या यात्रा महोत्सवास गुरुवारी घटस्थापना होवून यात्रेस प्रारंभ होणार आहे. या वर्षी २८ नोंव्हेंबर २०२२ पालखीची मिरवणूक व भव्य फटाक्याची अतिषबाजी करण्यात येईल. २९ नोंव्हेंबर सायंकाळी ५ वाजेस लंगर (साखळदंड) तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.भोकरदन एक अती प्रचीन शहर असून या शहराची अनेक नावे होती असे जाणकार मंडळी सांगतात. या शहराची भूकंपामुळे नव्याने वसहात झाली. जी आज अस्तीत्वात आहे. त्या काळी श्री खंडोबा माहाराजांच्या मुर्तीची स्थापना झाली असे पुर्वज सांगत.

आज ज्या ठिकाणी मंदिर अस्तीत्वात आहे. तेथे पुर्वी हवेली वजा मंदिर होते. निजाम राजवटीत त्या वास्तुचे बांधकाम तळेकर मंडळीतील यशाजी पाटलाचे वंशज गंगाजी पाटील व त्यांचे वशंज नबाजी पाटील व त्यांचे वंशज भिकाजी पाटील व त्यांचे सकारी बाळाभाऊ पाटील तळेकर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. ते करीत असतानां त्यांच्या शेजारील इतर समाजांच्या लोकांनी बरेच अडथळे आणले होते. परंतू त्यांनी संकटावर मात करुन हवेलीचे काम पुर्णत्वास नेले श्री खंडोबा महाराज चंपाषष्टीस तळी आरतीचा नैवेद्य अर्पण केला. ती तळी उचलन्याचा मान तळेकरांना पुर्वीपासुन आहे. त्यावरुन तळीकरचे आडनाव पडले. यापुर्वीची इमारत जीर्ण झाल्यामुळे २००० मध्ये गावातील काही मंडळीनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले त्यासाठी भक्तांकडून उपाहाराव्दारे पैसा उभा केला. आज एक भोकरदन शहरातील सुंदर अशी वास्तु उभी आहे. तिचे संपूर्ण काम पुर्ण झालेले आहे.

दर वर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतीपदे पासुन चंपाषष्टीच्या यात्रेात्सव होतो. २९ नोंव्हेंबर रोजी षष्टीस तळी उचलण्याचा कार्यक्रम भक्तगण करतात. यानंतर दुपारी ४ वाजेला नवसाच्या बारा गाडया ओढल्या जातात.

सायंकाळी ५ वाजता लंगर (साखळ दंड) तोडण्याचा कार्यक्रम म्हासरुळ येथील वाघे मंडळी करतात. यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावातून ४० ते ५० वाघे मंडळीची पथके येऊन गायणाचा व वाघ्यामुरळीचा स्पर्धा होतात. यात्रेच्या दिवशी किंवा मधल्या काळात नव वधू व वर दर्शनास येतात. सदरील संस्थान जालना, औरंगाबाद, जळगाव व बुलढाणा जिल्हयातील अनेक भाविकांचे जागृत देवस्थान व कुलदैवत आहे. या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव नारायण तळेकर यांच्यासह सदस्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...