आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापनाकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सांस्कृतिक सभागृहात ८ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे.
तरी उमेदवारांनी उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे. रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदी कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायांकित प्रतीचा संच सोबत ठेवून ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर जालना येथे उपस्थित राहावे, असे आवाहन चाटे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.