आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यशाने हुरळून न जाता पुढचा टप्पा सर करण्यासाठी नियोजन करा ; एकनाथ कदम यांचे प्रतिपादन

परतूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने स्पर्धेतच् टिकून राहत यशाला गवसणी घालण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. विशेषतः शालेय टप्पा पार करून आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात विद्यार्थी वर्गाने या टप्प्याने अधिक सजग आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अनेक प्रलोभने या काळात आपल्यापुढे येऊ शकतात, त्यांना बळी न पडता आपले ध्येय निक्षित करून त्या दिशेने आपले मार्गक्रमन असायला हवे असे मत, शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी व्यक्त केले. परतूर येथील आनंद विद्यालयात आयोजितदहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्याध्यापिका सत्याशिला तौर-कदम, संजय कदम, अजित पोरवाल, विष्णु वाघमारे, वर्षा बागल यांची उपस्थिती होती. दहावीच्या निकालात १०० टक्के निकालाची परंपरा यंदा सलग सातव्या वर्षी देखील आनंद विद्यालयाने कायम राखली आहे. विद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या श्रावणी राजकुमार तांगडे, मयूरी तुकाराम बागल, पूजा भारत मंडपे या विद्यार्थ्यांचा पालकांसह शालेय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

भविष्यातील गरजा आणि स्पर्धा लक्षात घेऊन शालेय संस्थानी देखील सुरुवातीपासूनच विद्यार्थ्याना विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करायला हवे. विद्यार्थ्याची विषयातील रुची, आवड लक्षात घेऊन त्याच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालकांनी देखील त्यांना मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे कदम म्हणाले. मागील दोन वर्ष शाळा बंद असलेल्या कालावधीत शालेय प्रशासनाने ऑनलाईन शिक्षण प्राणलीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम केले. दोन वर्षात अनेक अडचणीचा सामना शालेय प्रशासनाला करावा लागला. या अडचणीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीवर होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. कठीण काळात घेतेलल्या परिश्रमाचे फळ चांगल्या निकालाच्या रूपाने मिळाल्याचे मत मुख्याध्यापिका सत्याशीला तौर यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...